Home Accident News Accident: अहमदनगर दुचाकींचा अपघात, एक ठार एक जखमी

Accident: अहमदनगर दुचाकींचा अपघात, एक ठार एक जखमी

Kopargaon Two-wheeler accident, one killed, one injured

Kopargaon Accident | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर कासली या पंतप्रधान सडक रस्त्यावर बजाज कंपनीच्या दोन दुचाकीची कट मारल्याने समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दहीगाव बोलका येथील इसम बाळासाहेब दौलतराव शेटे वय ५८ यांचे निधन झाले तर त्यांची पत्नी निर्मला बाळासाहेब शेटे वय ५३ या जखमी झाल्या. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संतोष बबन निघोट याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मयताचा मुलगा फिर्यादी सागर भाऊसाहेब शेटे वय ३५ यांनी याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यात म्हंटले आहे की, आपले मयत पिताश्री बाळासाहेब शेटे व आई हे दोघे जण आपल्या बजाज कंपनीची दुचाकीवरून ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३: १५ च्या सुमारास जात असताना संवत्सर कासली या रस्त्यावर संदीप देवराम परजणे यांचे शेतीचे शेजारी आरोपी संतोष बबन शेटे हा आपल्या ताब्यातील बजाज दुचाकी कासलीकडून संवत्सरकडे भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने आपल्या ताब्यातील वाहनास कट मार्रून भरधाव वेगाने जात असताना समोरच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

वाचा: Ahmednagar News

या अपघातात आपले वडिलांचे निधन झाले तर आई गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Kopargaon Two-wheeler accident, one killed, one injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here