Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: सहा कट्टे, 12 काडतुसेसह संगमनेरच्या तरुणांना अटक

अहमदनगर ब्रेकिंग: सहा कट्टे, 12 काडतुसेसह संगमनेरच्या तरुणांना अटक

Ahmednagar Sangamner youths arrested with six cartridges, 12 cartridges

अहमदनगर |Ahmedagar: सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसेसह संगमनेरच्या (Sangamner) दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथे पकडले.

ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी ताब्यात घेतलेली तरुणांची नवे आहेत.  त्यांच्याकडून एक लाख 86 हजार 100 रूपयांचे सहा गावठी कट्टे, 12 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार मनोहर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ ऋषिकेश घारे व त्याचा साथीदार गावठी कट्टे विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (Anil Katake) यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांंनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने कारवाई करण्यात आली.

कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ पथकाने सापळा रचला. यावेळी दोन तरूण पायी येताना दिसताच त्यांना पथकाने पकडले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता ऋषिकेश घारेच्या कंबरेला पँटचे बेल्टमध्ये खोसलेला एक गावठी कट्टा पोलिसांना मिळून आला. समाधान सांगळे याच्या पाठीवर असलेल्या काळे रंगाच्या पिशवीची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यामध्ये पाच गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व कट्टे, काडतुसे जप्त करत दोघांना ताब्यात घेतले.

Read Also: Ahmednagar News

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव (शिर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

Web Title: Ahmednagar Sangamner youths arrested with six cartridges, 12 cartridges

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here