Home मनोरंजन कला विश्वातून दु:खद बातमी, या प्रसिद्ध गायकाचे निधन

कला विश्वातून दु:खद बातमी, या प्रसिद्ध गायकाचे निधन

krishna kumar kunnath passes away

कोलकाता | krishna kumar kunnath passes away:  कला विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ यांच ५३ वर्षी निधन झालं आहे. तो कोलकात्यात एका कॉन्सर्टसाठी गेला होता. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि तो कोसळले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत  घोषित केलं. वयाच्या ५३ व्या वर्षी केकेने अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी २०० हून अधिक गाणी गायली आहे. केके हा बॉलीवूडचा टॉप-क्लास गायक होता ज्याने अनेक भाषांमध्ये गाणी गायली. ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केले होते. 90 च्या दशकात केकेने रोमँटिक, मैत्री आणि प्रेमावर आधारित अनेक गाणी गायली होती आणि ती गाजलीही होती. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मात्र सध्या डॉक्टरांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: krishna kumar kunnath passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here