अकोले: श्रमातून संस्कृतीकडे .. ज्ञानवर्धिनी चा स्तुत्य उपक्रम
अकोले: श्रमातून संस्कृतीकडे .. ज्ञानवर्धिनी चा स्तुत्य उपक्रम
आज शनिवार दि .२० .१० .२०१८ रोजी ज्ञानवर्धिनी परिसरातील बूब रंगमंचच्या पाठीमागे बऱ्याच दिवसापासून माती दगड विटांचे ढिगारे होते .व त्यामूळे शाळेसमोर ने आण करणाऱ्या पालकांना , गाडी चालकांना प्रचंड अडचणीचे ठरत असे .. ह्या त्रासातून मूक्त होण्याचे शाळेने ठरविले . नगरपंचायत वर अवलंबून न राहता इ .३री ४थी च्या मुलांनी रांगा केल्या आणि दगड वीटांचे तुकडे चिमूक ल्या हातांनी दूर नेण्यास सुरुवात केली ‘ दीड तासात शाळेसमोरील रस्ता चकाचक सुंदर आणि स्वच्छ केला . भारत स्वच्छ अभियानाची खरीखुरी संकल्पणा आज शालेय विद्याथ्र्यांनी सार्थ करून दाखविली .ये जा करणाऱ्या नागरिकांनी श्रमदान करणाऱ्या विद्यार्थी व वर्गशिक्षकांचे थांबून कौतूक व अभिनंदन केले .
शालेय चेअरमन सतिशजी बूब, दिलीप भाई शहा . प्रतिमा कुलकर्णी यांना या स्वच्छता मोहिमेतील विद्यार्थ्यांना हातपाय स्वच्छ करण्यासाठी साबन व खाऊ म्हणून राजगिरा लाडू वाटप केले . या उपक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब नवले वर्ग शिक्षक बाळासाहेब मांडे ‘ वसीम शेख , योगेश नवले ‘ वर्गाचे स्वच्छता प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले .
Web Title: labor to culture Dnayanvardhini School Akole
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.