Home संगमनेर संगमनेर: थकीत बिलाच्या मागणीवरून वायरमनला वीट फेकून मारहाण

संगमनेर: थकीत बिलाच्या मागणीवरून वायरमनला वीट फेकून मारहाण

संगमनेर: थकीत बिलाच्या मागणीवरून वायरमनला वीट फेकून मारहाण

आश्वी: संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जनार्धन निवृत्ती भोसले यांच्याकडे थकीत वीज बिलाची मागणी केल्यामुळे प्रवीण जनार्धन भोसले यांनी एमएसइबी चे वायरमन बाबूलाल अब्बास शेख यांना शिवीगाळ करत वीट फेकून मारली. त्यात वायरमन जखमी झाले. आश्वी पोलीस ठाण्यात भोसले विरोधात कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

बाबूलाल शेख यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास वरवंडी येथील जनार्दन निवृत्ती भोसले यांचे २०१७ चे थकीत वीज बिल २८२० रुपये भरण्याची विनंती तेथे उभ्या असलेल्या संगीता जनार्दन भोसले यांना केली. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या प्रवीण भोसले याने शाब्दिक वाद घातला. त्यामुळे वायरमन शेख यांनी कार्यालयात चौकशी करून वीज बिल भरण्यास सांगितले. यावेळी तेथे सुभाष वर्पे, कैलास पाटोळे, कैलास वर्पे, नामदेव वर्पे हे उपस्थित होते. यांचा प्रवीण भोसले यांना राग आल्याने वायरमन शेख यांची गचंडी धरून अंगावरील शर्टाचे बटन तोडले. तर शिवीगाळ करत शेख यांच्या डाव्या हातावर विटकर फेकून मारली. त्यामुळे शेख जखमी झाले. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी भांडण सोडवले व त्याचवेळी हातात गज घेऊन येत शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर वायरमन शेख यांनी वरिष्ठ सहायक अभियंता यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या घटनेचा तपास आश्वी पोलीस करत आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


प्रमोटेड बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here