Home महाराष्ट्र Lata Mangeshkar : ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन

Lata Mangeshkar : ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन

Lata Mangeshkar Passes Away

Lata Mangeshkar Passes Away:  मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी आज ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु काल पुन्हा अचानक त्यांच्या प्रकृती खालाविल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.

Web Title: Lata Mangeshkar Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here