Home अकोले अकोले व कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर

अकोले व कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर

Nagar Panchayat Election president and Voice president

Nagar Panchayat Election: अकोले व कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक पदाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 16 फेब्रुवारी 2022 रोजी ही निवड होणार आहे.

नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असून येत्या दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. याच दिवशी अर्जाची छाननी होऊन 4 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे.एका पेक्षा आधिक उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यास दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी नगरपंचायत सभागृहात आम सभेत मतदानास इच्छुक सदस्यांनी हात उंचावून मतदान करुन ही निवड केली जाणार आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज भरावयाचे असून नगराध्यक्ष निवडीनंतर लगेच उपनगराध्यक्ष निवड केली जाणार आहे.

अकोले तालुक्यात भाजपाचे बहुमत आहे तर कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या दोनही तालुक्यातील कोण होणार नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे 16 फेबुवारीला कळेल. या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Nagar Panchayat Election president and Voice president

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here