Home अकोले अकोले तालुक्यात सामुहिक आरती केल्याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल

अकोले तालुक्यात सामुहिक आरती केल्याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल

कोतूळ: अकोले तालुक्यातील कोतूळ येथील श्रीगणेश मंदिरामध्ये दिनांक ११ एप्रिल २०२० रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा गुजरात क्षत्रिय मंत्री शंकरजी गायकर व अन्य १२ ते १३ लोकांनी एकत्र जमून सामुहिक आरती केल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १८८ व २६९  अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात शंकरजी गायकर सह अन्य १५  जणांवर गुन्ह्रे दाखल करण्यात आले आहे.

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. सामुहिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुद्धा अकोले तालुक्यात सामुहिक कार्यक्रम व आरती होत आहे. असे प्रकार तालुक्याचे दृष्टीने  चिंताजनक आहेत. करोनासारख्या महाभयंकर विषाणूवर जर विजय मिळवायचा असेल तर असे कृत्य थांबले गेले पाहिजे. दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली गेली पाहिजे असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी करून देखील काही जण नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.  

Website Title: Latest news Akole 15 persons crime 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here