Home अकोले अकोले : विठा घाटात गळफास घेऊन चुलता-पुतणीची आत्महत्या

अकोले : विठा घाटात गळफास घेऊन चुलता-पुतणीची आत्महत्या

अकोले : तालुक्यातील विठेघाटात झाडाला लटकलेल्या अवस्थेत स्त्री व पुरुष जातीचे दोन मृतदेह परिसरातील मेंढपाळांना दिसले. हे दोघे नात्याने चुलता-पुतणी असल्याचे समजते. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी : दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अकोले तालुक्यातील विठे घाटाच्या दुसऱ्या वळणावर दरीत झाडाला ब्लँकेटच्या तुकड्याच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत एक पुरुष व एका मुलीचा मृतदेह परिसरात मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना आढळले. त्यांनी लागलीच राजूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर हे दोन्ही मृतदेह चुलता-पुतणी असल्याचे समोर आले.

एक मृतदेह भारती रामदास जाधव (वय १७, रा. पाभुळवंडी, ता. अकोले) हिचा असून तिने काल दहावीचा रिपिटरचा पेपर दिल्याचे समजते, तर दुसरा मृतदेह चुलता जाधव (पूर्ण नाव समजू शकले नाही) याचा आहे. दोन्ही मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याप्रकरणी राजूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Website Title: Latest News Akole: Cousin’s Granddaughter Commits Suicide In Abrick Kiln

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here