Home अकोले अकोले : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यात होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

अकोले : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यात होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

अकोले : ९ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिन म्हणून महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व आदिवासी समाज आपल्या आदिवासी संस्कृतीचे जतन करतो, वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमात सहभागी होत असतात. अकोलेत देखील दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ९ ऑगस्ट रोजी अकोलेकरांना आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणार असल्याची माहिती याद्वारे दिली आहे. 

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात आज अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अकोले तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जन्मभूमी असल्याने तालुक्यातील आदिवासी, महादेव कोळी, आदिवासी ठाकर, भिल्ल समाज, कातकरी समाज वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करण्यापेक्षा एकत्रीतपणे अकोले येथे कार्यक्रम करण्याचे ठरविल्याने ९ ऑगस्ट रोजी हजारो आदिवासी सहभागी होणार असून अकोलेकरांना या दिवशी आदिवासी संस्कृ तीचे दर्शन होणार आहे. 

या बैठकीस भाजपचे नेते अशोक भांगरे, उपसभापती मारुती मेंगाळ, भिल्ल समाजाचे नेते अशोक माळी, मारुती लांघी, पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे, डॉ. विजय पोपेरे, वाळू धोंगडे, बाबुराव अस्वले, सुरेश पथवे, राजू सावंत, तुकाराम मेंगाळ, पोपट मेंगाळ, वाळिबा भोईर, विठ्ठल शेंगाळ, पांडुरंग पथवे, रामनाथ पथवे, योगेश पथवे, संजय फोडसे यासह आदी उपस्थित होते.

Website Title: Latest News Akole: Adivasi Culture Visits In Akole On World Tribal Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here