Home अकोले अकोले : स्मार्ट कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी; ग्राहक पंचायतीचे आगारप्रमुखांना निवेदन

अकोले : स्मार्ट कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी; ग्राहक पंचायतीचे आगारप्रमुखांना निवेदन

अकोले : स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी एसटी डेपोच्या खिडकीत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची प्रचंड गर्दी होऊन हेळसांड होत असल्याने तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठांच्या ठिकाणी स्मार्ट कार्ड केंद्र सुरू करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या अकोले शाखेने नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे..

याबाबत अकोल्याचे एसटी आगारप्रमुखांना नुकतेच लेखी निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही पाठविण्यात आली आहे. या निवेदनात तालुक्यातील समशेरपूर, राजूर, कोतूळ व अकोले शहरात एसटी डेपो वगळता अन्य ठिकाणी दोन अशा सहा ठिकाणी स्मार्ट कार्ड वितरण खिडक्या सुरू करण्याची मागणी केली आहे..

निवेदनात पुढे म्हटले की, तालुका आदिवासी बहुल व भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने ज्येष्ठांची व दिव्यांगांची हेळसांड होवू नये, पुन्हा पुन्हा चकरा मारायला लागू नये, त्याचबरोबर व्याधीग्रस्त व आजारी ज्येष्ठांना जास्त मनस्ताप वाढू नये यासाठी तालुक्यात किमान ६ केंद्र सुरू करावेत. जेणेकरून ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी सर्व सवलतधारक लाभधारकांना शासनाच्या या योजनेचा लाभ घेता येईल..

सध्या एसटी आगार, अकोले येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व विद्यार्थी यांची एकच झुंबड उडालेली असून, मनुष्यबळाअभावी आगारात देखील एकाच खिडकीद्वारे या महत्वाकांक्षी व समाजोपयोगी योजनेचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. याकरिता ग्राहक पंचायतीने एसटी आगार प्रमुख ज्ञानेश्­वर आव्हाड यांना समक्ष भेटून स्मार्ट कार्ड योजनेची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्याची मागणी केली. ती मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. याचा फायदा स्मार्ट कार्ड लाभधारकांनी घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

Website Title: Latest News Akole: IncreaseThe Number Of Smart Card Centers; Request To Client Panchayat Chief

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here