Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली गुरुपोर्णिमा दिमाखात साजरी

राजूर: सर्वोदय विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली गुरुपोर्णिमा दिमाखात साजरी

राजूर: गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी विद्यालयात गुरुपोर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम व्यासमहर्षी यांची पूजा व स्मरण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यर्थ्यांनी सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. एम.डी. लेंडे होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री. शेडगे आर.एन. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल. पी. यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत गुरुंविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्री. बारवकर एस. आर.  यांनी गुरूंच्या संगतीविषयी महती विषद करत मुलांची मने जिंकली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी गुरूंची आज्ञा पाळणे हीच आमच्यासाठी खरी गुरुपोर्णिमा असेल अशा शब्दात मुलांना विविध दाखले देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बारावी विज्ञानची विद्यार्थ्यांनी शुभांगी बांडे हिने केले तर या कार्यक्रमात बारावी विज्ञान व वाणिज्य या विद्यर्थ्यांनी महत्वपूर्ण सहभाग दाखविला. यात यश मैड, ओंकार कानकाटे, दर्शन लहामगे, अरशद मणियार, प्रथमेश,पूर्वा अवसरकर साक्षी मुंडे, प्रियांका माळी, रेश्मा लहामगे, दर्शना हेकरे, अपूर्वा लांडे, तेजस्विनी देवकर आदी विद्यार्थ्यांनी प्रमुख सहभाग दाखविला. श्री. धतुरे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार मानले तसेच शेवट गोड करत विद्यर्थ्यांकडून सर्व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला.    

Website Title: Latest News SVM Rajur Guruponima Celebration 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here