Home अकोले अकोले: पत्नीचा पोटगीचा दावा न्यायालयाने नाकारला

अकोले: पत्नीचा पोटगीचा दावा न्यायालयाने नाकारला

अकोले: पत्नीने स्वत: हून पतीचे घर सोडलेले असेल किंवा एकमेकांच्या संमतीने ती वेगळी राहत असेल तर पत्नी पोटगी मिळविण्यास अपात्र असल्याचा महत्वपूर्ण निकाल अकोले न्यायालयाने नुकताच दिला आहे. कायदृयात तरतूद आहे. म्हणून त्या तरतुदीचा वापर कसाही करता येत नाही. कायदृयाचा वापर ढाल म्हणून करायचा असतो. तलवार म्हणून नाही असेही निकालपत्रात म्हटले आहे.

अकोले येथील न्यायदंडाधीकारी (प्रथम वर्ग) यांचे न्यायालयात वर्षा दत्तू सदगिर यांनी पती दत्तू निवृत्ती सदगीर यांचे विरूद्ध महिलांचे कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ चे कलम १२,१८,१९,२०,२२ व २३ प्रमाणे अर्ज दाखल केला होता. परंतु दाखल केलेल्या कलमानुसार एकही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकली नाही. याउलट पत्नी च्या विरोधात सबळ पुरावा म्हणून आकाश व ऋतुजा या दोन्ही मुलांची साक्ष न्यायालयाने अधोरेखित केली.

पती दत्तू सदगीर यांचे वकील आर.पी. खाडगीर यांनी मुंबई उच्च न्यायालायाचा निर्मलदास रतन आल्हाट विरूद्ध सुनिता निर्मलदास अल्हाट (२००६(३) एम. एच. एल. जे.५४९) या न्याय निवाड्याचा आधार घेत युक्तीवाद केला.

 या न्याय निवाड्यात मुंबई अच्च न्यायालयाने अर्जदार हिने स्वत:हून पतीचे घर सोडले असेल किंवा एकमेकांच्या संमतीने ती वेगळी राहत असेल तर अर्जदार ही पोटगी मिळण्याचे कामी अपात्र असल्याचे निर्देशित केले आहे. तसेच पत्नी व तिचा प्रियकर यांचे एकत्रित छायाचित्र न्यायालयाच्या निदर्शनास अणून दिले.

त्यामळे पत्नीने केलेला अर्ज हा पतीला त्रास देण्यासाठी तसेच आर्थिक व मानसिक छळ करण्यासाठी केलेला आहे. म्हणून पत्नी ही पतीपासून पोटगी मिळविण्यासाठी  अपात्र ठरते. कायदृयाचा ढाल म्हणून वापर करायचा असतो, तलवार म्हणून नाही असेही न्यायालयाने या निकालपत्रात म्हटले आहे.

Website Title: Latest News Akole: Court Rejects Wife’s Claim

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here