अधिकाऱ्यांनी योग्य माहिती द्यावी अशी सूचना आता देतो नंतर आदेश देईल: सभापती दत्तात्रय बो-हाडे
अकोले: माजी मंञी मधुकरराव पिचड व मा आ.वैभवराव पिचड यांनी संधी दिलेली आहे त्या संधीचे सोने करुन तालुक्यातुन पंचायत समितीत काम घेऊन येणारा नागरीक नाराज होऊन जाणार नाही अशी ग्वाही देत वैभवभाऊच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तर अधिकाऱ्यांनी योग्य माहिती द्यावी अशी सूचना आता देतो नंतर आदेश देईल असा सज्जड दम नूतन सभापती दत्तात्रय बो-हाडे यांनी दिला.
अकोले तालुका पंचायत समितीत माजी मंञी मधुकर पिचड व मा. आ.वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सभापती, उपसभापती यांची ७ जानेवारी रोजी निवड झाल्यानंतर आज पदग्रहन समारंभ माजी आ.वैभव पिचड यांच्या प्रमुख उपस्थित पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला यावेळी झालेले बैठकीत सभापती बोलत होते. यावेळी माजी आ.वैभव पिचड, भाजप गटनेते जालिंदर वाकचाैरे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, यशवंत अभाळे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे, मच्छिंद्र मंडलिक, सुुधाकर देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,माजी सभापती साै आशा पापळ, भानुदास गायकर, साै रंजना मेंगाळ, पं.स.सदस्या साै माधवी जगधणे,सिताबाई गोंदके, सारीका कडाळे, उर्मिला राऊत, अलका अवसरकर गटविकास अधिकारी भास्कर रेेंगडे आदी उपस्थित होते.
वैभवराव पिचड यांनी आधिका-याची झाडाझडती घेत तालुक्यातील कामाचा आढावा घेतला व लवकरच नविन पदाधिकारी सह विशेष आढावा बैठक घेऊन यात अद्यावत माहिती द्यावी अशा सुचना केल्या.
यावेळी नुतन सभापती, उपसभापती यांचा माजी आमदार पिचड यांनी फेटा घालून सत्कार केला तर गटविकास अधिकारी रेंगडे यांनी नियुक्तीचे पञ दिले समवेत माजी सभापती साै मेंगाळ उपस्थित होत्या. पदभार स्विकारल्यानंतर लगेच माजी आ .वैभव पिचड यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांना तालुक्यात झालेल्या व चालु असलेल्या कामाची माहिती विचारून आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य,शिक्षण, बांधकाम,एकात्मिक बालविकास,कृषी व इतर विभागात रिक्त असलेल्या पदाबाबत माहिती मागितली. रोजगार हमी योजनेच्या कामाची परिस्थिती, घरकुल योजनेचा आढावा .तसेच विविध योजनांचा आलेला निधी व त्याचा विनियोग याची माहिती घेतली.लवकरच नविन सभापती उपसभापती यांच्या उपस्थित विशेष आढावा बैठक घेण्याची सुचना केली यावेळी सर्व विभागानी कामकाजाची सविस्तर माहिती सादर कराव्यात अशा सुचना केल्या. यावेळी कळस खुर्द व टाकळी येथील आदिवासी उपयोजनेतून सुरू असणाऱ्या पाईपलाईन चे पैसे अदा केलेलं आहेत मात्र काम अपूर्ण असल्याचे तक्रारी यावेळी करण्यात आल्या त्याची चौकशी चे आदेश सभापती नी दिले आहे. पांगरी चे ग्रामसेवक हे जनतेची अडवणूक करीत असून वन विभागाच्या कामावरील मजूर यांनचे काम बंद करावे असे पत्र दिलेच्या तक्रारीचे ही निराकरण करण्याचे आदेश सभापतींनी दिले. पाचनई, धामणवन, पाचपट्टा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रसाठी तीन दोन चा प्रस्ताव करून वनविभागाची जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे सूचना श्री पिचड यांनी केली. तसेच विहिरी चे कामे काही अपूर्ण आहेत का त्याची पण चौकशी करावी अशी मागणी केली. म्हाळादेवीच्या आरोग्य केंद्र पावसाळ्यात गळते अशीही तक्रार नागरिकांनी केली
कोट
मला ठेकेदाराशी काहीही घेणे नाही कामे पूर्ण होण्यासंदर्भात माहिती द्या सहा महिन्यापेक्षा जास्त दिरंगाई झालेल्या कामाची चाैकशी करा.अनेक दिवसांनंतर अडीचणीची माहिती घेतली ञुटी आहेत नविन सभापती, उपसभापतीच्या काळात प्रशासनाच्या कामकाजात गती आणा तसेच नुतन सभापती, उपसभापती यांना घेऊन तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्यासह सर्व बांधकामावर जाऊन सविस्तर माहिती द्या.
मा आमदार वैभवराव पिचड
Website Title: Latest News Akole Panchayt samiti sabhapati