Home अकोले चटका लावणारी घटना मेहेंदुरी : मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी ल्युसीची आहुती

चटका लावणारी घटना मेहेंदुरी : मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी ल्युसीची आहुती

अकोले (प्रा.डी. के. वैद्य):-  मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी ल्युसीची आहुती,घरामध्ये हळहळ, सन्मानपूर्वक दफन विधी आणि तीन दिवस घरामध्ये चूल पेटली नाही.वनखाते मात्र झोपलेले. पिंजरा लावण्याची मागणी….

चटका लावणारी घटना मेहेंदुरी (तालुका अकोले)येथे दोन दिवसांपूर्वी घडली.

लॅब जातीची ल्युसी नावाची कुत्री  मालकिणीच्या बचावासाठी पुढे आली. आणि तिने तशा अर्थाने मालकिणीला वाचवण्यासाठी स्वतःची आहुती दिली असेच म्हणावे लागेल.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे या भागात पट्टेरी वाघ असल्याची या कुटुंबाची आणि परिसरातील लोकांची खात्री आहे.

घटना म्हटली तर साधी. पण माणूस आणि कुत्रा यांच्या अन्योन्य संबंध हा कायम राहिलेला आहे.इमान व विश्वास या दोन संज्ञा लागू पडणारे जनावर व पशु म्हणजे श्वान होय. कुत्रा होय. या कुत्र्याने सोमवारी दि ६ आपल्या मालकिणीवर पट्टेरी वाघ झेप घेऊन खत्म करणार असे लक्षात आल्यावर मालकिणीच्या हाताला हिसडा देऊन तिने पट्टेरी वाघावर झेप घेतली आणि आपल्या मालकिणीला वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.

सोमवारी सायंकाळी सहा तारखेला सायंकाळच्या झुंजूमुंजू वातावरणात कायमची बिबट्याची भीती ध्यानात घेऊन सौ अर्चना सुनील मालुंजकर या आपल्या पाळीव ल्युसी नावाच्या कुत्रीला गोठ्यामध्ये बंदिस्त छपरात बांधण्यासाठी जात होत्या.ल्युसी ही लॅब ब्रीडची आहे. पोलिसांच्या श्वान पथकात या ब्रीडचा अंतर्भाव असतो.तिला जेंव्हा रानच्या वस्तीची राखणदार म्हणून घरी आणल्यावर ती या घराची सदस्य बनली.खाद्य,आजार, आणि तिची घर संरक्षण जबाबदारी इतकी सुंदर होती की ती मालुंजकर कुटुंबातील सदस्य बनली.

 दरम्यान सोमवारी शेजारील बागायती पिकांमध्ये पट्टेरी वाघ पोहोचलेला आहे आणि तो मालकीणीवर झेप घेण्याच्या पावित्र्यात आहे. हे ल्युसीने हेेेरले. तिने त्या पट्टेरी वाघावर जोरदार झेप घेतली.पट्टेरी वाघावर चवताळून तिचा राग तिने व्यक्त केला. पण वाघाने मात्र तिला अलगद पकडले आणि

गाजावाजा न करता वाघ ल्युसीला जबड्यात पकडून शेजारच्या उसात गायब झाला.

हा प्रकार एवढा अनपेक्षित,अकल्पित आणि अतर्क्य असा होता की,भोवळ येता-येता

सौ अर्चना मालुंजकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.पण त्यांचा कंठ फुटत नव्हता. मदतीची अपेक्षाही करता येत नव्हती कारण आजूबाजूला परिसरामध्ये कोणीही उपलब्ध नव्हते आणि गेली दोन वर्षे घरांमध्ये घरच्यांना लळा लावणारी ल्युसी ही पट्टेरी वाघाच्या भक्षस्थानी पडण्याचे आणि आपल्या उघड्या डोळ्याने पाहण्याचे दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आले.

शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते रंगनाथ मालुंजकर यांची वस्ती ही मेहेंदुरी-म्हाळादेवी रस्त्यावर आहे.तेथे चिरंजीव सुनील आपली आई,मुलगा,सून यांच्या समवेत राहतात.या

 परिसरामध्ये ऊस शेती आहे.नदीच्या काठावर असणाऱ्या त्यांच्या घराशेजारी बागायती क्षेत्र आहे. त्यांचे व परिसरातील असणारे बागायती क्षेत्र असल्याने येथे पट्टेरी वाघाचा वावर आहे असा त्यांचा आणि भाऊसाहेब बंगाळ यांचा दावा आहे.भाऊसाहेब बंगाळ यांच्याही शेळ्या बकरे,बोकड, कोंबड्या अशी मोठी हानी या  वाघाने केली असल्याचा दावा त्यांनी केला.

शिवाय परिसरातील कुत्रे, मांजर, पाळीव प्राणी, गाय,वासरे,शेळ्या ,कोंबड्या या वाघाने भक्ष म्हणून पळवले आहे.त्याने परिसरातील लोकांच्या नाकी नऊ आणले आहे.त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण आहे. आणि हाच प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहताना आपल्या आवडत्या विश्वासू कुत्रीला या कुटुंबाला मुकावे लागले.

दुसऱ्या दिवशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व सौ अर्चना यांचे पती सुनील यांनी चार जणांना सोबत घेऊन सर्व शेतातील परिसर शोधला.उसामध्ये ल्युसीचे धूड त्यांना सापडले.अशा अवस्थेत तिला त्यांनी घरी आणले. दुसऱ्या माणसांना सोबत घेऊन  मंगळवारी सायंकाळी तिचा मोठ्या जड अंतकरणाने दफनविधी पार पाडला.

गेले दोन-तीन दिवस घरामध्ये चूल पेटलेली नाही.घरातील सर्वच हवालदिल झालेले आहेत. आणि हा प्रकार कसा घडला याचीच ते सर्वत्र चर्चा करत आहेत. त्यांच्या या क्लेशदायक परिस्थितीमुळे गावातील अनेकांनी त्यांच्या घराला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आणि या अनुषंगाने या परिसरात वनखात्याने पिंजरा लावावा अशा प्रकारची मागणी केली आहे.

चौकट:

या भागांमध्ये पट्टेरी वाघ आहे अशा प्रकारचा दावा या घटनेने बाधित झालेले प्रगतशील शेतकरी सुनील मालुंजकर यांनी केला. पट्टेरी वाघ आम्ही स्वतः पाहिला असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे.पट्टेरी वाघ या भागात तरी आहे काय? हा प्रश्न असला तरी वनखात्याने मात्र या दृष्टीने शोध घेऊन किंवा ठसे तपासून तपास करण्याची आणि या भागातील जनतेला भयमुक्त करण्याची गरज आहे.

Website Title:  Latest News Akole lusi

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here