Home अकोले संकटे आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच असतात: राहीबाई पोपेरे.

संकटे आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच असतात: राहीबाई पोपेरे.

सर्वोदय खिरविरे येथे वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी:  आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटांची भिती नसते. संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होता.

अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बिजमाता राहिबाई पोपेरे विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे हे होते.या प्रसंगी माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, शालेय समितीचे अध्यक्ष एम.के.बारेकर, शालेय समितीचे सदस्य दिनेश शहा, माजी विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे, ग्राम पंचायत सदस्य त्रिंबक पराड,कचरु बेणके, प्राचार्य अंतुराम सावंत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना राहिबाई पोपेरे म्हणाल्या की, जुन ते सोन खणखणीत नाण याप्रमाणे जिद्ध आणि विश्वास असेल तर येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आपण सुंदर बनवू शकतो. त्यासाठी स्वतःला घडविण्यात वेळ खर्च करा. आपले विचार नेहमी मोठे ठेवा.

कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एन. कानवडे यांनी माणसाला चमकायचे असेल तर स्वत:चा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहीजे.त्यासाठी आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते फक्त विचार सकारात्मक असावेत असे प्रतिपादन केले.

एम.के. बारेकर, दिनेश शहा, मारुती डगळे, त्रिंबक पराड यांनी आपल्या मनोगतातुन महाराष्ट्र केसरी विजेता पैहिलवान हर्षवर्धन सदगिर यांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याचे आव्हान केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शैक्षणिक वर्षात कला, क्रिडा, सांस्कृतीक, वाड़मय, वत्कृत्व या क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी तसेच शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कृतिशील शिक्षक दिपक पाचपुते यांचाही सत्कार करण्यात आला.

मान्यवरांचे स्वागत तसेच अहवाल वाचन प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले.

Website Title: Latest News Svm Function Rahibaibai Popere

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here