Home अकोले अंबड गावचे नाव वैष्णवी जाधवने राज्य पातळीवर चमकविले

अंबड गावचे नाव वैष्णवी जाधवने राज्य पातळीवर चमकविले

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत  वैष्णवी जाधव राज्यात प्रथम

अकोले: अकोले महाविद्यालयातील विद्यार्थीनीने वैष्णवी रमेश जाधव हिने मुंबई येथील पोलिस मुख्यालयात पोलीस रेझींग डेच्या निमित्ताने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा महाराष्ट्र पोलीस महासंचालक विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील सातही विभागातून एक- एक जोडी या प्रमाणे सात जोडया मध्ये 14 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मध्ये अकोले महाविद्यालयातील विद्यार्थीनी वैष्णवी रमेश जाधव हिने ‘सोशल मिडीया लक्ष विचलित करणारी बाब आहे किंवा नाही?’ या विषयावर स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक प्राप्त करत 1 लाख 25 हजारांचे रोख व स्मृतीचिन्ह, मानपत्र पारितोषिक पटकाविले. तर नाशिक येथील अक्षदा देशपांडे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यावेळी महाराष्ट्राचे महाअधिवक्ता कुंभकोणी व राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यभरातील आयएएस अधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधूकर पिचड, मा आमदार वैभवराव पिचड, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य भास्कर शेळके, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, सिताराम गायकर, मधुकर नवले, विक्रम नवले, सभापती दत्ता बोराडे, उपसभापती दतात्रय देशमुख, संरपच रोहीदास जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, पत्रकार दत्ता जाधव, रामहारी भोर व आंबड ग्रामस्थांसह अकोले तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Website Title: Latest News State level debiting competition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here