Home अकोले कर्ज माफीचा निर्णय अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडास पाने पुसणारा.

कर्ज माफीचा निर्णय अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडास पाने पुसणारा.

अकोले: शेतकरी बंधु भगीनिंनो अकोले तालुक्यामधील शेतकरी मुख्यत्वे अल्पभुधारक बागायती शेती असलेला बागायतदार शेतकरी आहे, अतीशय कमी शेती आसल्याने एका शेतकऱ्यांच्या वाट्याला एक ते दोन एकर  जास्तीत जास्त एक हेक्टर शेती असणाऱ्या शेतकर्यास पीक निहाय कुठलीही नॕशनलाईज बँक कींवा वि,वी,कार्य सोसायटी एकरी विस ते तीस हजार रुपये पीककर्ज देते. अकोले तालुक्यात जास्तीत जास्त ऊस  तसेच भाजीपाला ही नगदी पीकं मोठ्या स्वरुपात घेतली जातात. या पीकांस कर्ज मर्यादा जास्तीत जास्त हेक्टरी ५०ते ६०हजार रुपये आहे.मार्च महीन्यात प्रत्येक गावच्या वि,वी,कार्य  सोसायट्यांच्या व नॕशनलाईज बँकेच्या १००% कर्ज वसुल्या होतात. नव्हे-नव्हे सबंधीत संस्था त्या मार्च एंन्डींगला करुनच घेतात.व एप्रील कींवा मे मध्ये त्या संस्था कर्ज वितरन करत असतात. अशा प्रकारे अतीशय अडचणीत वेळेला टक्केवारी वर पैसे घेऊन मार्च एंन्ड ला सोसायटी व बँका भरणारा नियमित कर्जदार अल्पभुधारक प्रामानिक शेतकरी,१००% या कर्ज माफीत बसत नाही.

मागील वर्षी दुष्काळ पडला अकोले तालुका केवळ शासनाच्या सॕटेलाईट पहानीत हीरवा-गार दीसतो म्हनुन दुष्काळाच्या यादी मधुन वंचित राहीला. गेल्या दोन दिवसाच्या न्युजपेपरच्या बातमँमध्ये संगमनेर तालुक्यास पंचवीस  कोटीच्या मदतीचे वाटप असे मथळेच्या मथळे आम्ही वाचतो आहोत. अकोले तालुक्यास मा,महामहीम राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु असताना दिलेली हेक्टरी आठ हजार रुपयाची मदतही आजमीतीस संपूर्ण  शेतकर्याच्या बँक खात्यावरती वर्ग झालेली नाही.व अतीवृष्टीचा सर्वात जास्त फटका आपणास भोगावा लागला आसताना बाकीच्या शेजारील तालुक्याच्या आकडेवार्यांकडे पाहुनच अकोले तालुक्यातील शेतकऱ्याने जगायचे का असा प्रश्न पडतो आहे

मा,आमदार डॉ. किरण लहामटे साहेबांना अकोले तालुक्यातील तमाम मतदारांनी भर-भरुन मताच दान देऊन विधानसभेत पाठवले आहे. त्यांचे जोडीला शेतकर्यांचे नेते किसान सभेचे राज्याचे नेते अकोले तालुक्याचे सुपुत्र डॉ.अजित नवले यांनी तात्पुरत्या स्वरुपात पक्ष पार्ट्यांचे झेंडे-दांडे बाजुला ठेऊन आ,डॉ. कीरण लहामटे साहेबांस विजयी करण्यासाठी मनापासुन प्रयत्न केले. काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्याच्या नंतर पंधरा-वीस मिनिटांत काँ.डॉ. अजित नवले यांची पहीली प्रतीक्रीया सोशल मीडीयावर झळकली त्यांना ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या तोडास पाने पुसनारी वाटली आहे. काँ .डॉ.,अजित नवले साहेब संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्याचे नेतृत्व करतात म्हनुन ते केवळ अकोले तालुक्या साठीच वेगळी भुमीका मांडु शकत नाहीत म्हनुन काँ,डॉ.अजित नवले साहेबांच्या मागनीस पाठींबा म्हनुन मी माझे मत माडले आहे. काँ,डॉ.माने-दोन लाखाची मर्यादा मागे घेत शेतकर्याचा सातबारा सरसकट कोरा करावा. कर्जाचे नवे जुने करनारे नियमीत कर्जदार शेतकरी, कर्जाचे पुनर्गठन केलेले शेतकरी, मध्यम मुदतीचे कर्जदार शेतकरी, पतसंस्था,सावकार,मायक्रोफायनांन्सचे कर्जदार शेतकरी,या सर्वांचे कर्ज माफ करावे या सर्व मागन्यांसाठी तालुक्याचे सुपुत्र म्हनुन अकोले तालुक्यावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे विरोधात डॉ. अजित नवले साहेब व आ.डॉ. कीरण लहामटे साहेब यांनी प्रसंगी आंदोलन करावे आम्ही सर्व शेतकरी आपणासोबत राहु असे सुरेशराव नवले (मुख्य संघटक युवा स्वाभिमान सामाजिक संघटना) यांनी मत मांडले आहे.

Website Title: Latest News Akole taluka Debt waiver decision wiped the faces

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here