सर्वोदयमधील विविध गुणदर्शन कार्यक्रमाने राजूरकरांची मने जिंकली
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. या संमेलनात आज विद्यर्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार होत असताना राजूर गावातील ग्रामस्थांनी व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राजूर येथील डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्था संचालक विलास पाबळकर, विजय पवार, व्यवस्थापक प्रकाश महाले, विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. लेंडे, उपप्राचार्य लहानू पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, प्रा. एस.एस.पाबळकर, प्रा. बादशहा ताजणे, विलास तुपे, ललित मुतडक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अण्णासाहेब धतुरे, प्रा. बिना सावंत, प्रा. बी.एस. घिगे, प्रा. अजित गुंजाळ यांनी केले होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. व्ही.टी. तारू, प्रा. विकास जोरवर, प्रा. अमोल तळेकर, प्रा. स्मिता हासे, प्रा. एस,व्ही. भालेराव, प्रा. अविज्ञा चासकर, प्रा.उंबरकर, प्रा.दिपाली देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे उपप्राचार्य लहानु पर्बत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Website Title: Latest News SVM Rajur Annual function 2019