Home अकोले आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर आपण कुठल्याही पदापर्यंत पोहचू शकतो: रोहिदास लांडगे

आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर आपण कुठल्याही पदापर्यंत पोहचू शकतो: रोहिदास लांडगे

सर्वोदय विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

राजूर: आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी आणि त्याचबरोबर आत्मविश्वास असेल तर आपण कुठल्याही पदापर्यंत पोहचू शकतो असे प्रतिपादन रोहिदास लांडगे सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले. ते गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. तसेच स्वप्न पहा, ध्येय ठरवा, व ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करा असे मयूर मोहिते सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमप्रसंगी रोहिदास लांडगे सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, सौ. लांडगे, सुधाकराव नागरे माजी केंद्र प्रमुख जिल्हा परिषद, सौ. नागरे, मयूर मोहिते सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे, सह सचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, भरत सावंत, एम. एन. देशमुख कॉलेज प्राचार्य बाबासाहेब देशमुख,व्यवस्थापक प्रकाश महाले, मंगलदास भवारी, मेस्त्री साहेब, लांडगे सर मुख्याध्यापक कळंब विद्यालय,  संजय घिगे, घिगे ताई, रजनी टिभे, विजय पवार, प्राचार्य मनोहर लेंडे, उप प्राचार्य लहानू पर्बत आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयातील विद्यार्थ्यांना वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा विभागातील प्रथम पारितोषिके वितरीत करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी रोहिदास लांडगे यांनी १ लाख रुपये तसेच मयूर मोहिते यांनी २१ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचा परिचय प्रा.दीपक बुऱ्हाडे यांनी केला व त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. संतराम बारवकर व छायाचित्रण प्रा. अजित गुंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी मानले.

Website Title: Latest News SVM Annual prize distribution ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here