Home अकोले अकोलेतील आमदार उतरले रस्त्यावर, मास्क वापरा, दारू बंदीची मागणी

अकोलेतील आमदार उतरले रस्त्यावर, मास्क वापरा, दारू बंदीची मागणी

अकोले: लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथीलता तसेच आज गुरुवार आठवडा बाजार भरत असल्याने अकोले शहरातील नागरिक मोठ्या संखेने रस्त्यावर आले आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी स्वतः आमदार डॉ. किरण लहामटे रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी सर्वाना विनंती करून घरीच थांबा, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा आणि बाहेर पडले असाल तर तोंडाला मास्क बांधा असे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोले तालुक्यात लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथीलता मिळाल्याने बरेचसे लोक रस्त्यावर उतरले आहेत. बरयाच लोकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. आमदार डॉ. लहामटे यांनी स्वतः शहरात फिरून लोकांना मास्क बांधण्याचे आवाहन केले आहे.

वाचा: बियरचा टेम्पो पलटी 

अकोले तालुक्यात दारू बंदी हवीच मागणी: देशात, राज्यात, जिल्ह्यात दारू चालू असो की बंद मात्र अकोले  तालुक्यात दारूची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविली आहेत. माता भगिनी धुणे भांडी करून पैसे कमवितात मात्र त्यांचे पती दारूसाठी कष्टाचे पैसे उडवितात. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दारूमुळे कौटुंबिक, सामाजिक, स्वास्थ्य धोक्यात येते. त्यामुळे अकोले मतदार संघात दारूची दुकाने बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वाचा: संगमनेरमध्ये ४ जामखेडचे  करोना बाधितांना सुट्टी, आता उरले केवळ 

Website Title: Latest news Akole taluka MLA On Streets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here