Home संगमनेर संगमनेरात हॉटस्पॉट लॉकडाऊन संपताच पुन्हा एकदा संगमनेर हादरले

संगमनेरात हॉटस्पॉट लॉकडाऊन संपताच पुन्हा एकदा संगमनेर हादरले

संगमनेर: शहर व तालुक्यात आठ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र टप्प्याटप्प्याने आठही रुग्ण बरे झाले होते. हे रुग्ण बरे झाल्याने संगमनेर करोनामुक्त झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच पुन्हा एकदा संगमनेरकर हादरले आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एका वृध्द व्यक्ती शहरातील एका नामाकीत रुग्णालयात दाखल झाली होती. त्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी त्याबाबत ग्रामीण रुग्णालयाला सुचना दिली. त्यानुसार त्या व्यक्तीचा स्त्राव घेऊन मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. दरम्यान संशियीत च्या नातेवाइक दवाखान्यात न नेता घरी नेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्या व्यक्तीचा सकाळी मृत्यू झाला. प्रशासनाने तत्काळ त्याची दखल घेत नमुन्याची अहवालाची तत्काळ मागणी केली. या अहवालात त्या व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा मिळण्यापूर्वी तो किती जनाच्या संपर्कात आला त्याच्या मृत्यू नंतर आणखी किती लोक संपर्कात आले? ज्या खासगी रुग्णालयात तो गेला होता. तेथील कोण कोण त्या व्यक्तीच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे काम सुरु झाले आहे. आज सकाळी त्या व्यक्तीचा चाचणी अहवाल पोझिटिव्ह आल्याने सूचनेवरून त्या नामांकित खासगी रुग्णालयाच्या डॉक्टराना होमकोरंटाइन करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून करोनाने संगमनेरमधील पहिला बळी घेतला आहे.

वाचा: संगमनेर तालुक्यात करोनाचा पहिला बळी, मृत्यूनंतर करोना असल्याचे स्पष्ट

संगमनेर शहरात हॉटस्पॉट पॉकेट हे २३ एप्रिल ते ७ मे पर्यंत प्रशासनाने घोषित केले होते मात्र आज करोना मृत्यूने संगमनेरच्या चिंतेत वाढ झाल्याने प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.    

Website Title: Coronavirus Sangamner one death 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here