Home अकोले अकोलेतील सात जणांना कॉरांटाइन

अकोलेतील सात जणांना कॉरांटाइन

अकोले: जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस १४ दिवसांसाठी कॉरांटाइन केले जाते. याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील  निळवंडे येथे मुंबईवरून आलेले आजी, नात व गुजरात येथून आलेल्या पाच अशा सात व इंदोरीतील तीन लोकांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, अंगणवाडीत कॉरांटाइन केले आहे.

तालुक्यातील आंबड येथील एक विवाहित जोडपे गुजरात येथून आले असून या जोडप्यास आरोग्य तपासणी करून मराठी शाळेच्या वर्ग खोलीत १४ दिवसांसाठी कॉरांटाइन केले आहे.

इंदोरीत आणखी १९ लोक परगावाहून येणार आहेत, त्यांना पण शाळेत कॉरांटाइन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वाचा: संगमनेर तालुक्यात करोनाचा पहिला बळी 

गावात गुजरातमधून एक जोडपे आल्याची माहिती आंबडचे  सरपंच दत्तू जाधव यांना समजताच करोना ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विठा येथील आरोग्य अधिकारी डॉ. चित्रा हिले यांच्याशी संपर्क साधून त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोलीत १४ दिवसांसाठी कॉरांटाइन केले आहे.

बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीच्या साम्भंधित कुटुंबातील व्यक्तींनी माहिती लपविल्यास त्याच्यावर साथ रोग पसरविण्याच्या कलमाअंतर्गत प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी घ्यावी.

Website Title: News Quarantine seven in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here