Home अकोले संगमनेर येथे करोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूरचे लोक, सहा जण कॉरांटाइन, राजूर बंद

संगमनेर येथे करोना रुग्णाच्या अंत्ययात्रेला राजूरचे लोक, सहा जण कॉरांटाइन, राजूर बंद

अकोले: संगमनेर तालुक्यातील धांदळफळ बु. येथे करोना मयात व्यक्तीच्या अंत्यविधीला राजूर तालुका अकोले येथील काही लोक गेले होते. या मधील ६ व्यक्तींना आरोग्य यंत्रणेने होम कॉरांटाइन करण्यात एके आहे. यामुळे राजूर गाव ३ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी गावातील नागरिकांना अंत्यविधीला गेलेल्या लोकांनी स्वतः हून पुढे यावे. असे आवाहन केले आहे दि.4 तारखेला राजूर येथील काही लोक करोना बाधित व्यक्तीच्या अंत्यविधीला गेले होते.  ही माहिती समजताच राजूर ग्रामपंचायतीने अकोले तहसीलदारांना दिली.

वाचा: सासऱ्यांने तलवारीने केला जावयाचा खून

वाचा: संगमनेर तालुक्यात ०७ रुग्ण नगरमध्ये एकूण ५१ वर

या पार्श्वभूमीवर राजूर गाव शनिवार ते सोमवार तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. याबरोबरच गावतील जे लोक धांदरफळ येथे गेले होते, त्यांनी स्वतःहून पुढे यावे, प्रशासनाला सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीने आवाहन केले आहे. दरम्यान पोलीस, वैद्यकीय अधिकारी, सरपंच आणि स्थानिक कमिटी यांनी पावले उचलेली आहेत. मात्र किती व्यक्ती अंत्यविधीला गेले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Latest News: Latest news corona sangamner rajur closed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here