ह.भ.प. अरुण महाराज चौधरी हिंदू धर्म रक्षक परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये अकोले तालुका अध्यक्षपदी निवड
ह.भ.प. अरुण महाराज चौधरी धामणगाव पाट यांची हिंदू धर्म रक्षक परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये अकोले तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी श्रीराम नगर वैष्णवी चौक देवळाली प्रवरा येथे पार पडलेल्या हिंदूधर्म रक्षक परिषदेच्या कार्यकारिणीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला हिंदू धर्म रक्षक परिषद या संघटनेचे धर्मो रक्षति रक्षितः हे ब्रीदवाक्य असून त्यांच्या खालील प्रमाणे शाखा आहेत.
1.बजरंग सेना
2. मातृशक्ती रणरागिनी
3. नवदुर्गा रणरागिनी
4. धर्मप्रसारक व प्रचारक
5. गौरक्षक
6. सेवाकार्य
7. बालसंस्कार केंद्र
या पदासाठी अकोले तालुक्यातून बरेच अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु निवड समितीने योग्य निर्णय घेऊन अकोले तालुक्याची धुरा अरुण महाराज चौधरी यांच्यावर सोपवली असून अकोले तालुक्यांमध्ये हिंदूधर्म रक्षक परिषदेचा प्रसार करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
Website Title: Latest News Arun Maharaj Chaudhari