अकोले: वृद्ध पित्याचे अकोले पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरु
अकोले: जमिनीचा हिस्सा द्यावा या मागणीसाठी स्वतः चाच मुलगा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने एक ८० वर्षाच्या वृद्ध पित्याने अकोले पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरु केले आहे.
अकोले तालुक्यातील येथील गेनू धोंडीबा भुजबळ असे उपोषण कर्त्या पित्याचे नाव आहे. त्यांनी पोलिसांना याबाबत निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले आहे की, आपल्याला दोन मुले व तीन मुली असून मुलीचे लग्न झाले आहेत दोन्ही मुले आपल्याला सांभाळत नाही तर नातू आपला सांभाळ करतो.
दोन्ही मुले माझ्याशी नेहमीच भांडण करत मारहाण करतात. म्हणून मी माझी वडिलोपार्जित मिळकतीत दोन्ही मुलांना तीन- तीन एकर क्षेत्र १९९८ साली नावावर करून दिली. तर मी व माझ्या पत्नीच्या उदरनिर्वाहसाठी दीड एकर क्षेत्र माझ्याच नावावर ठेवले असून त्यामध्ये हिस्सा मिळावा म्हणून मुले मला व माझ्या पत्नीला नेहमी त्रास देताच तसेच संपून टाकण्याची भाषा करतात त्यामुळे आम्ही प्रचंड दहशतीखाली जगत आहे. पूर्वी त्यांनी माझ्या जमिनीमध्ये ट्रक्टर जेसीबी घालून कांदा रोपाचे व उभ्या गव्हाचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. मला माझ्या नातवाला, नातसुनेला जबर मारहाण केली. परंतु त्यांनी माझ्यावरच घरात घुसून मारहाण केल्याची खोटी तक्रार दिली तरी साम्भंधित मुलावर कारवाई करावी अशी मागणी या वृद्ध पित्याने केली आहे. Website Title: Latest News Akole Old father starts fasting