Home अकोले Latest News: अकोलेतील लॉज मालकावर गुन्हा दाखल

Latest News: अकोलेतील लॉज मालकावर गुन्हा दाखल

अकोले: शहरातील प्रशांत लॉजमध्ये चार प्रवाशांचे ओळखपत्र न घेता प्रवेश दिला. तसेच त्यांनी नोद्वाहित नोंदी केलीही नाही यावरून लॉजचा मालक बापू उर्फ प्रशांत भानुदास हासे (रा.इंदोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेल्या अधिक माहितीनुसार लॉज मालक प्रशांत हासे याला सी आर पी सी १४९ अनन्वे लॉजमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र घेऊन त्यांची नोंदवहीत नोंद ठेवणेबाबत आदेशित केले असताना देखील त्यांनी सरकारी आदेशांचे उल्लंघन करून लॉजमध्ये नमूद चार प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र न घेता आणि नोंदवहीत नोंद न घेता रूम दिली

त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्ल्लंगन झाले यावरून यांच्यावर गु.र.न.४४७/१९ नुसार भा.द.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार एस.पी. वाघ हे करीत आहेत.

Website Title: Latest News Accused lodge owner of Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here