Home अकोले मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविणार: आ.पिचड

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविणार: आ.पिचड

घारगाव: अकोले मतदार संघासह पठार भागातील पाटपाण्याचे व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या दौऱ्यावर महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे बुधवारी आले होते. त्यावेळी बोटा या ठिकाणी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी महायुतीचे मान्यवर उपस्थित होते.

वैभव पिचड म्हणाले, पाच वर्ष विरोधात असताना सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम आम्ही केले आहे. वेळ प्रसंगी रस्ता रोको आंदोलनही केली मात्र आपले सरकार नसल्याने मतदारसंघातील रस्त्यांची कामे, पाटपाण्याचे प्रश्न सोडविता आले नाही. तरीही आपल्या आमदार निधीतून थोडा थोडा निधी देण्याचे काम केले आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मा. शिवाजी तळेकर म्हणाले अकलापूर गावच्या विकासासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भर भरून निधी दिला आहे. आज त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागले आहेत. अशोक वाघ म्हणाले, माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांनी पठारभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून त्यामुळे जनता आज त्यांच्या पाठीमागे नक्कीच आहेत.

Website Title: Latest News Devendra will solve all the questions  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here