Home अकोले सर्वोदयच्या शुभम लांडगेची दिल्ली येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सर्वोदयच्या शुभम लांडगेची दिल्ली येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

राजुर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकत्याच आळंदी जि.पुणे येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील १९ वर्षाखालील मुले ४८ किलो वजनगटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात शुभम लांडगे याने प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची  दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्याला एम. एन. देशमुख कुस्ती संकुल (साई सेंटर )मधील साई मार्गदर्शक श्री. तानाजी नरके यांनी मार्गदर्शन केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे प्रा.विनोद तारू, प्रा.अजित गुंजाळ,भारत भोसले,भाऊसाहेब बनकर,जालिंदर आरोटे यांनी अभिनंदन केले. व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Website Title: Latest News Svm Rajur National Level Wrestling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here