संगमनेर: मलकापूर येथील युटेक कारखान्याला भीषण आग
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे युटेक कारखान्याला आग लागल्याची घटना आज शनिवार दिनांक २५ पहाटे साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.
शोर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारखाण्याची मोठी वित्त हानी झाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोटच पसरले होते. या आगीत सुमारे ९२ हजार किंटल साखर, गोडाऊन आणि साठलेला कच्चा माल बराचसा वस्तू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचारी व साखर कामगारांच्या कामगारांनी ही आग विझवली. रवींद्र पुरोषत्तम बिरोले यांचा हा कारखाना आहे.
गोडाऊनलाच आग लागल्याने कारखानाचे मोठे नुकसान झालेले आहे. या भागातील लोकांना रोजंदारी व उस उत्पादक शेतकऱ्यांचा आशेचा किरण असणाऱ्या या युटेक कारखान्याला शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. करोना सावट असल्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट अद्याप केलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
Website Title: Latest news Massive fire at Utech factory in Malkapur Sangamner