Home अकोले अकोले तालुक्यात अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्या एका महिलेस पतीने चाकूने भोकसले

अकोले तालुक्यात अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्या एका महिलेस पतीने चाकूने भोकसले

अकोले: अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्या एका महिलेस पतीने चाकूने भोकासल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात घडली आहे. या महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, अति रक्तस्त्राव आणि परिस्थितीती नाजूक असल्यामुळे तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाळादेवी परिसरामध्ये एक आदिवासी कुटुंब असून त्यातील काही व्यक्ती या पंचक्रोशीत बनावट दारू तयार करून विकण्याचे कामे करत असतात सध्या करोनाचे सावट असल्यामुळे सगळीकडे  लॉकडाऊन सुरु आहे. मात्र या परिसरात सर्व अवैध धंदे सुरु असून गोवा गुटखा देखील दुकानांमध्ये चढ्या भावाने दिला जात आहे. या परिसरात रान वनात काही ठिकाणी टीमपाच्या सहायाने दारू तयार करण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी एका महिलेने मोठे धाडस करून यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न करून धंदे बंद करण्याचा तिचा उद्देश होता.  त्यात तिचा पतीदेखील असल्याचे बोलले जात आहे.

Read: Salman Khan Upcoming Movies 2020 and 2021

त्यामुळे तू अशा प्रकारची माहिती बाहेर का सांगितली असे म्हणून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघांच्या बाचाबाचीचे रुपातर मोठ्या वादात झाले आणि पती पत्नीचा वाद विकोपाला गेला त्यांनतर या महाशयाने थेट पत्नीला धारदार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केला ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर संभंधित महिलेस उपचारासाठी अकोले रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर महिला गंभीर असल्याचे तिला नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून महिलेच्या फिर्यादीनंतर पुढील गुन्हा दाखल होईल अशी शक्यता आहे.

Website Title: Latest News husband stabbed a woman who was giving information 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here