Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात हे सात तालुके आहेत करोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यात हे सात तालुके आहेत करोनामुक्त

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर वेळीच जिल्हा प्रशासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतीबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तालुकास्तरावर सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के तालुके करोना मुक्त राहण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात पहिला रुग्ण १२ मार्चला सापडला होता. हा रुग्ण नगर शहरातील होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत होत्या. करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर मात्र जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले व विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली. तालुकास्तरावर सुद्धा आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा व एप्रिल सुरुवातीला रुग्ण वाढीचा ठरला. या काळात जामखेड, संगमनेर अशा तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून आले. सध्याच्या परिस्थितीत तर रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे. पण त्यातही दिलासादायक गोष्ट म्हणजे अद्यापही कर्जत श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, अकोले या सात तालुक्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमित मास्क्चा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे अशा काही नागरिकांशी निगडीत असणाऱ्या उपाययोजनांचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

Website Title: News Ahmednagar seven talukas corona free 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here