Home अकोले अकोले: चुलता पुतणी प्रवरेत बुडाले, अभियंत्याचा मृत्यू

अकोले: चुलता पुतणी प्रवरेत बुडाले, अभियंत्याचा मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील उंचखडक येथे पाण्यात बुडणाऱ्या आपल्या पुतणीला वाचविताना इंजिनियर राजू मुरलीधर घोडके यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. इंजिनियर राजू घोडके यांचा मृत्यू झाला आहे तर पुतणी संस्कृती घोडके ही डॉ. भांडकोळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली आहे. तिच्यावर वेळेवर उपचार झाल्याने ती बचावली आहे.

याबाबत माहिती अशी की, राजू घोडके हे अभियंते होते. त्यांनी अकोले, चंद्रपूर, संगमनेर अशा ठिकाणी इंजिनियर म्हणून कामगिरी बजावलेली आहे. सध्या ते संगमनेर येथे रहिवासी होते. परंतु करोनामुळे मुलांना सुट्टी असल्याकारणामुळे ते गावी आले होते. सायंकाळी ते पुतणी व एका मुलास प्रवरा नदीवर आले होते. त्यांची पुतणी नदीकाठी माशांना पाहत होती यावेळी तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. हे पाहून राजू घोडके यांनी तिला हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती वाहू लागल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्यामुळे तेही बुडू लागले त्यादरम्यान मुलीस नदीकाठाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला ती नदी काठाकडे आली परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने नाका तोंडात पाणी गेले हा सर्व प्रकार लहान मुलाने पाहिला असता तो गावाकडे पळत सुटला आणि आरडाओरडा करत गावातील नागरिकांना जमाविल्रे. त्यांनी नदीत उडी मारून दोघांना बाहेर काढले यावेळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती तर राजू घोडके पाण्यावर तरंगत होते. संस्कृतीला भांडकोळी या हॉस्पिटलमध्ये तातडीने हलविण्यात आल्याने तिचे प्राण वाचले. राजू घोडके यांनी अगोदरच आपले प्राण सोडले होते.

Website Title: News cousin drowned in pravara river Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here