Home अकोले पिंपळगाव खांड धरणामुळे पठार भागाला लाभ: वैभवराव पिचड

पिंपळगाव खांड धरणामुळे पठार भागाला लाभ: वैभवराव पिचड

अकोले: माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मुळा बारमाहीचे स्वप्न पाहिले होते. ते आज पूर्ण झाले असून मुळा नदीमध्ये ठिकठीकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, अनेक धरणे बांधून शेवटच्या टप्प्यात पिंपळगाव खांड हे धरण बांधून मुळा बारमाही केली. याचा मुळा खोऱ्यासह पठार भागातील गावांना लाभ झाला असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी केले आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पिचड बोलत होते. यावेळी डॉ. अशोक इथापे, सभापती कैलास वाकचौरे, मीनानाथ पांडे, जालिंदर वाकचौरे, एम. धुमाळ, सीताराम भांगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.पिचड पुढे म्हणाले,की, गेल्या चाळीस वर्षापूर्वीचा पठार आणि आजचा पठार व अकोले तालुका यात अमुलाग्र बदल झाला आहे. मुळा बारामाही झाल्याने शेतीमध्ये चांगले उत्पन्न घेतले जात आहे. शेत्तीतून शेतकरी समृद्ध झाला अनेक विकास कामे झाली, हि कामे मात्र विरोधकांना दिसत नाही.

गेल्या पाच वर्षात आपण तालुक्यासाठी निधी आणता येऊ शकला नाही, त्यामुळे रस्ते, पाणी यांचे प्रश्न मार्गी लागू शकलो नाही. तालुक्यातील विकास कामे मार्गी लागावीत यासाठीच आपण भाजपात गेलो. सत्तेत असल्यावर प्रश्न मार्गी लागतात यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे. मी पक्ष बदलला नसता तरी मला तुम्ही निवडून दिले असते पण तुमचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मी संघर्ष केला आहे.

Website Title: Latest News Pimpalgaon Dam benefits the plateau Vaibhavrao Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here