Home अकोले अकोले: प्रभू रामचंद्र संघाचे आदर्श : यशोवर्धन वाळिंबे

अकोले: प्रभू रामचंद्र संघाचे आदर्श : यशोवर्धन वाळिंबे

अकोले- विद्वान ,धनवान,शक्तीमान या बरोबर श्री राम चारित्रवान होते म्हणून प्रभुश्री राम संघाचे आदर्श आहेत मात्र रामाचे अस्तित्व नाकारणारे रोम चे हस्तक आहेत  असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे  यांनी केले.
अकोले येथे संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात प्रमुख पाहुणे होते.राहुल ढोक यांनी गायलेल्या गीताने कार्यक्रमाची  सुरवात झाली.वाळिंबे पुढे म्हणाले कि रामाचा आदर्श घेऊन ध्येय प्रेरित संघ स्वयंसेवका मुळेसंघाची कार्यपद्धती व संघ कार्याचा प्रसार व विस्तार  सर्वदूर झाला आहे.समाजात संघाबद्दल सकरात्मक व नकरात्मक आश्या दोन्ही बाजूने चर्चा केली जात असली तरीही संघ व्यक्ती निर्माण करण्याचे काम अखंडित पणे करीत आहे.जनतेने देखील या राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले केले. परिचय प्रा.भाऊसाहेब नवले यांनी केला तर आभार तालुका कार्यवाह प्रमोद लहामगे यांनी मानले.प्रारंभी अकोले शहरातून सह घोष संचलन काढण्यात आले.अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.शिस्तबद्ध संचलन पाहण्यासाठी साठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.या संचालनात अकोले,कोतूळ,राजूर,वीरगाव,ब्राम्हणवाडा,समशेरपूर,कळस,मनोहरपूर,शेंडी,या ठिकाणाहून स्वयंसेवक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
Website Title: Latest News Lord Ramchandara yashovardhan Valimbe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here