Home अकोले जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश: मधुकरराव पिचड

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश: मधुकरराव पिचड

अकोले: समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवून युवकांच्या हाताला काम द्यावयाचे आहे. या बरोबरच तालुक्याचा विकास व्हावा तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच भाजपात गेलो असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी स्पष्ट केले.

भाजप महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारार्थ आदिवासी भागातील वाकी, मान्हेरे, लाडगाव, देवगाव, शेणीत,टिटवी, आदी गावांचा पिचड यांनी दौरा केला. या दौऱ्यात गावोगावी ढोल ताशांच्या गजरात मधुकरराव पिचड यांचे स्वागत करण्यात येऊन महिलांनी औक्षण केले.

पुढे ते म्हणाले की, मोदी सरकारने पाच लाख पर्यंत आरोग्य योजना, घर नाही त्यांना घरकुल, बचत गटांना बिनव्याजी कर्ज,उज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस देऊन महिलांचा सन्मान केला आहे. अशा प्रकारे गरिबांच्या हिताचे काम सरकारने हाती घेतले आहे. आपल्याला देखील यापुढे बंधारे बांधण्याचे काम करून पाणी अडवायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम करावयाचे आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट निर्माण केले तर विरोधाकाकडे केवळ जनतेचे दिशाभूल करण्याचे काम आहे असेही शेवटी पिचड म्हणाले.

अकोले तालुक्यातील विकास कामे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे. यामुळे आमदार म्हणून वैभव पिचड निवडून येणार आहेत. मात्र मंत्री म्हणून आपल्याला पाहायचे आहे. तसेच या भागातील रखडलेल्या पिंपरकणे उड्डाण पुलाचे काम येत्या काही महिन्यातच पूर्ण करावयाचे आहे.    

Website Title: Latest News BJP to solve public issues Madhukar Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here