Home अकोले अकोले: सर्वोदयच्या देशमुख, कुदनरची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

अकोले: सर्वोदयच्या देशमुख, कुदनरची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

अकोले :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व इंदापूर तालुका ज्युदो संघटना आयोजित पुणे विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा नुकत्याच शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील सोनू देशमुख १९ वर्षाखालील ४५ किलो वजनगटात व ऋषिकेश कुदनर १७ वर्षाखालील ६६ किलो वजनगटात नागपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना प्रा.विनोद तारू यांनी मार्गदर्शन केले.

सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.एम.एन. देशमुख, सचिव टी.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, विश्वस्थ विवेक मदन, प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य लहानू पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, प्रकाश महाले, प्रा. अजित गुंजाळ व सर्व शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Website Title: Latest News Svm Rajur state level Judo Competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here