राजूर: पिचडांसारख्या प्रवृत्तीला याच मातीत गाडा: धनंजय मुंडे
अकोले (संपादन- सागर शिंदे):– अकोले तालुक्यातील राजूर येथे लहामटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे आले होते. मुंढे म्हणाले की, सभेला उपस्थित सर्वांचे आभार. बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती. कधी मी येथे येतोय.तुमच्या डोळ्यात दोन गोष्टी दिसल्या. पिचडांनी जे केले त्याचा राग व डॉ. लहामटे यांना विजयी करायचे आहे. ही निवडणुक जनता विरुद्ध नेता आहे. एखाद्या पक्ष सोडावा का लागतो. ४० वर्षे या पिचडांनी एकाचे दोन केले. आणि त्यामुळे व दुसरीने १५ कोटी केल्यामुळे पिचडांना पक्ष बदलायची वेळ येते. मी मानला त्या मुख्यमंत्र्याला लाज कशी वाटत नाही. असे म्हणायला की, आमच्यावर भ्रष्टाराचे आरोप झाले नाही. या देशाच्या इतिहासात ९० कोटीचे घोटाळे डायरेक्ट गिळून घेतले. जनतेने ज्या भाजपला ३०३ खासदार दिले तरी याला घेऊ की त्याला घेऊ असे झालेय. अनेक प्रश्न बाजुला लोटायला आणि तुमचे लक्ष विचालित करायला हे षडयंत्र केले आहे. पिचडांची त्यांच्या मतदारसंघात चव गेली. म्हणून मोदी लाटेचा आधार घेऊ पाहिला. यांना लाज का वाटत नाही. जो कारखाना पवार साहेबांनी दिला. साधा एमडी देखील बुके द्यायला गेला नाही. मग लाज का वाटत नाही. बरं झाले वैभव गेले त्याशिवाय आम्हाला हे नवकिरण डॉ. लहामटे मिळाले नसते.
डॉ. किरण लहामटे
डॉ. लहामटे म्हणाले, जनता माझा माय-बाप आहे. लोकं दिवसभर काम करताय आणि रात्री माझ्या झोळीत दोन रुपये टाकतो. हे पांग मी कोठे फेडू. डॉ. बाबासाहेब म्हणतात एका मताची किंमत भाजी भाकरीची नाही. त्यामुळे तुमची मते विकू नका. मलिदे घ्या पण मतदान मला करा.
या राज्यात ३७० चा संबंध काही नाही. कर्जमाफी, अत्याचार व रोजगार विसरून जावे. म्हणून हे भांडल आहे. ७२ हजारांची मेघा भरती रोजगारासाठी नव्हती ती भाजप पक्षाची होती. तरुणांना सोयरीक नाही. बिगर नोकरीची पोरगी मिळवून दाखव आणि मग म्हण मोदी है तो मुन्कीन है. अशोक भांगरे यांचे मी कौतुक करेल. त्यांनी मागे पाय टाकला. भांगरे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. पण, एकच इच्छा आहे. हे पिचडांचे बेने आता मला परत नको. परळीचा गुलाल मी राजुरला येणार आहे. २१ तारखेला मायबाप जनतेला विनंती आहे. पण, पिचडांसारख्या प्रवृत्तीला याच मातीत गाडा.
बाजीराव दराडे
बाजीराव दराडे यांची भाषण करताना जीभ घसरली. त्यांनी काही शिवसैनिकांच्या भर स्टेजवर आयमाय काढली. माजी पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे यांना या शिवसैनिकांनी कसे लुटले. हे खुलेआम सांगितले. युती फायनल नव्हती तेच अकोल्यात युती फायनल करून असा टोला दराडे यांनी मच्छिंद्र धुमाळ यांचे नाव न घेता लावला. उद्या जे मत मागायला येणार आहे. त्यांना विचारा देवाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही कोणाचे पॅकेज घेतले नाही. त्यामुळे मी मत मागायला आलो आहे. पण असा एकही नेता सापडणार नाही. पोपट दराडे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आपलाच साठवून ठेवलेला मलिदा बाहेर येईल. तो नाकारू नका. तो घ्या. पण, तुमच्या मनातील व्यक्तीलाच मतदान करा. अजित नवले म्हणाले ज्या पिचडांनी धरणात झिंगे सोडले. त्यांचे निवडणुकीत झिंग-झिंग झिंगाट करण्याची वेळ येईल. एक सुदैव म्हणायचे की, ज्यानी आयुष्यभर दोन नंबरची कमाई केली. त्यांचे नाव मशिनवर देखील दोनच नंबरवर आले आहे. पिचडांनी जे तुर्तर्रमखान पोसले आहे. त्यांना देखील आपल्याला धडा शिकवायचा आहे. त्यासाठी बोगस मतदान होणार नाही. याचा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
दशरथ सावंत
दशरथ सावंत म्हणाले की, पुर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा पण, डॉ. बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला. त्यातून जनतेला राजा निवडून द्यायचा अधिकार दिला. त्यामुळे, सामान्य मानसाला राजा करा. ही सुचना आम्हाला जनतेने दिली. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना एकास एक उमेदवार देण्याचे सामाजिक शहानपण आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पिचडांनी समान पाणी वाटप कायदा करण्यास सहाय्यभूत केले. त्या पिचडांनी उतारवयात बोंबींल खाल्ला. म्हणून यांना घरी बसवाचे आहे. अशोक भांगरे म्हणाले. आम्ही एकास एक उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे डॉ. किरण लहामटे म्हणजे अशोक भांगरे हे विसरु नका. आता मत विभाजन होणार नाही. याची काळजी आम्ही घेतली. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे. काय करायचे आहे. आता प्रत्येकाच्या मनात आहे पिचडांना पाडायचे आहे.
Website Title: Latest News Bury the tendency of ants Dhananjay Mundhe