Home अकोले अकोले: अकरा पंचायत सदस्य पिचड यांच्या समवेत

अकोले: अकरा पंचायत सदस्य पिचड यांच्या समवेत

अकोले: अकोले पंचायत समितीचे सर्व सदस्य १२ पैकी ११ सदस्य आमदार वैभव पिचड यांच्या पाठीशी ठाकर समाजही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज येथील आ. वैभव पिचड यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा सभापती व शिवसेना नेत्या मेंगाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत सदस्य नामदेव आंबरे, दत्ता देशमुख, गोरख पथवे, देवराम सामेरे, दत्तराय बोऱ्हाडे, सीताबाई गोन्दके, उर्मिला राउत, अलका अवसरकर, माधवी जगधने, सारिका कडाळे, १० सदस्य उपस्थित होते. पर्यायाने उपसभापती व बंडखोर शिवसेना नेते मारुती मेंगाळ यांचे आसन डळमळीचे झाले आहे.

मेंगाळ म्हणाल्या, पंचायत समितीच्या सभापती उप सभापती निवडी प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यांच्या पाठीम्ब्यावर मी सभापती झाले. पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात युती झाली. त्यामुळे मी पक्षाच्या भूमिकेबरोबर असल्याचे सांगितले. आम्ही ११ सदस्य आपापल्या गणात सर्वाधिक मताधिक्य आमदार वैभव पिचड यांना मिळवून देऊ आणि प्रत्येक सदस्य आपापल्या गणात प्रचार सुरु केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

Website Title: Latest News Eleven panchayat members with Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here