Home अकोले पिचड यांनी ४० वर्ष सतत तालुक्याचा विकास केला: रावसाहेब वाकचौरे

पिचड यांनी ४० वर्ष सतत तालुक्याचा विकास केला: रावसाहेब वाकचौरे

अकोले: गत चाळीस वर्षात अकोले तालुक्यातील सर्वच विभागात जो विकास झाला तो विकास नगर जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करताना अगोदर केलेला विकास पाहावा मग आरोप करावेत असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते तथा अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी दिला आहे.

वाकचौरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले की, तालुक्यातील मुळा, प्रवरा, आढळा यांसह पठार, आदिवासी भाग, अकोले शहर यांसह तालुक्यात विकास कामांची गंगा पिचड साहेबांनी आणली. या तालुक्यातील विकास कामांसाठी राज्य पातळीवर ज्यांच्याकडे पाहिले जाते व मंत्रालय पातळीवर त्यांच्या ताकदीने त्यांनी या तालुक्यासाठी जे योगदान दिले ते योगदान नक्कीच इतरांपेक्षा भूषणावह आहे. निवडणुकीच्या काळात काही जण येतात आरोप प्रत्यारोप करतात मात्र प्रत्यक्ष जाऊन या भागातील विकासकामे कशी झाली हे न पाहता निवडणुकीच्या काळात आरोप करून एकमेकांवर चिखलफेक केली जाते हे योग्य नाही. मुळा प्रवरा, आदिवासी भाग, पठार भागातील पाण्याचा प्रश्न, माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभवराव पिचड यांनी छोटे मोठे धरणे, बंधारे बांधून सोडविला आहे. तालुक्यातील ८० टक्के भाग बारामाही कसा होईल यासाठी प्रयत्न केला. या तालुक्यातील संस्थांच्या माध्यामातून शेतकरी विकासासाठी जे जे करता येईल ते काम ४० वर्षात केले.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे अकोले तालुक्यात देखील कोट्यावधी रुपयांचे विकास कामे तेच करू शकतात. विरोधी उमेदवाराने जिल्हा परिषद सदस्य असताना कोणती कामे केली. आज तुम्ही ज्या पक्षात आहात. त्या पक्षात आम्ही पण होतो. मात्र आम्ही जेथे स्वाभिमानाने जातो तेथील पक्ष श्रेष्ठचा मानसन्मान ठेवतो. तालुक्यातील संस्कृतीला आजही राज्याभरात तेवढाच सन्मान आहे. त्यामुळे वैचारिक आरोप करताना विरोधकांनी निश्चितच विचार करावा.  

Website Title: Latest News Akole Pichad developed the taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here