उद्धव होणार राज्याचे मुख्यमंत्री: अखेर ठाकरे सरकार
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीने आज एकमताने हा ठराव मंजूर केला असून उद्धव ठाकरे हेच या आघाडीचे नेतृत्वही करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती ठरणार आहेत. येत्या १ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Website Title: Latest News Uddhav Thakare CM