Home अकोले आवड असेल तर निवड होते: हरिभाऊ बेणके.

आवड असेल तर निवड होते: हरिभाऊ बेणके.

खिरविरे येथे अपुर्व गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

पिंपळगाव नाकविंदा(सचिन लगड)- ध्येयापर्यंत पोहचायचे असेल तर आपल्याला त्याविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. कारण आवड असेल तर निवड निश्चित होते. असे प्रतिपादन जेष्ठ नागरीक हरिभाऊ बेणके यांनी केले. 
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे अपुर्व गणित व विज्ञान प्रदर्षणाचे आयोजन केले होते. याप्रसंगी जेष्ठ नागरिक हरिभाऊ बेणके विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी पोलीस पाटील हिरामण बेणके, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बेणके, विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.बेणके म्हणाले कि, सराव तुम्हाला बळकट बनवतो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. विश्वास तुम्हाला पुढे चालव्याची प्रेरणा देत असतो. म्हणूनच यश व विश्वासाच्या बळावर प्रगती करा. तुमच्यातुनच उदयाचे शास्त्रज्ञ निर्माण होतील. असेही विचार श्री. बेणके यांनी प्रतिपादीत केले.
यावेळी विदयार्थ्यांनी प्रकाश परावर्तनाचे नियम, जलविद्युत शक्ती, सौर ऊर्जापासुन शेतीला पाणी, पाण्याच्या दाबावर चालणारा जेसीबी, जलपरी, हायड्रोलीक क्रेन, सौर पॅनलवर चालणारी कार, हायड्रोलीक कार पार्कींग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण कुलर, बहुउद्देशिय सफाईकरण, लिप्ट, गणितीय सुत्र, भौमितीक आकृती, विद्युत शेगडी, वाफेवर चालणारे इंजीन, फुफुसाचे कार्य, गेट ऑफ इंडिया, स्वच्छ गाव -सुंदर गाव, कापसापासुन धागा निर्मिती, घरघुती व्हिटर, पवनऊर्जा, आलेख रचना, भात काढणी यंत्र, जलवाहतुक यांसारखे उपकरणे तयार करून प्रदर्षणात मांडण्यात आले.
उपकरण रचनेसाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य अंतुराम सावंत, दिपक पाचपुते, संपत धुमाळ, कविता वाळुंज, भाऊसाहेब कोते, नानासाहेब शिंदे, धनंजय लहामगे, रामदास डगळे, वनिता बेंडकोळी, संजय देशमुख, विक्रम आंबरे, सचिन लगड, संगिता डगळे, भास्कर सदगिर आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्षण यशस्वीतेसाठी सुनिल देशमुख, सुधिर पराड, पि.के. बेणके, सुभाष बेणके आदींनी परीश्रम घेतले.
Website Title: Latest News svm khirvire Science Exhibition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here