Home अकोले संशोधन वृत्तीला चालना दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक होतील: डॉ. मोहन वामन

संशोधन वृत्तीला चालना दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक होतील: डॉ. मोहन वामन

राजूर(प्रकाश महाले):– शिक्षकांनी अध्यापन करताना आपल्यातील नवीन संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडाव्यात.विद्यार्थ्यांमधील संशोधक शोधावेत. त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक होईल असा विश्वास पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी व्यक्त केला.
     सत्यनिकेतन संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी,बालवयात संशोधन वृत्ती जोपासली जावी यासाठी आपल्या गुरुवर्य रा वि पाटणकर सर्वोदय विद्यालय राजूर, नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्यालय कातळापूर, सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे, डॉ राजेंद्र प्रसाद आश्रमशाळा शेणीत व एम एन देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यातील पहिल्या तीन उपकरणांची निवड करत त्याचे राजूर येथील गुरुवर्य रा वि पाटणकर सर्वोदय विद्या मंदिरात एकत्रित प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ वामन बोलत होते. अध्यक्षस्थानी सचिव टी. एन. कानवडे होते.
डॉ वामन म्हणाले की, देशातीलच नव्हे जगातील अनेक शास्त्रज्ञानां संशोधन करताना पहिल्याच प्रयत्नात अपयश आले मात्र त्यांनी त्यात पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि शोध लावले.विद्यार्थ्यांनीही आपल्यातील संशोधन वृत्ती वाढवावी,प्रत्येक बाबीचे निरीक्षण करून त्याची नोंद ठेवावी.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे धडे देऊन त्यांच्या विचारांना चालना द्या,अशा विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्रांमध्ये सहलीचे आयोजन करत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा असे मार्गदर्शन करत उज्वल भारत घडविण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडवा असे आवाहन प्राचार्य डॉ वामन यांनी केले.
सचिव टी.एन. कानवडे यांनी प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश आपल्या मनोगतातातून व्यक्त केला. सहसचिव मिलिंद उमराणी यांनी प्रास्तविक केले.उपप्राचार्य एल पी परबत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन अध्यापक संतराम बारवकर यांनी केले तर आभार प्राचार्य मनोहर लेंडे यांनी मानले.
यावेळी माजी प्राचार्य एम. के. बारेकर,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जे. डी. आरोटे, संचालक व्ही. डी. पवार, व्ही टी पाबळकर, व्यवस्थापक प्रकाश महाले, प्राचार्य अंतुराम सावंत, मुख्याध्यापक संजय शिंदे, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे सर्व विद्यालयातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
Website Title: Latest News SVM Rajur Science Exhibition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here