अकोल्यात भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या जेरबंद
अकोले: शहरातील सीडफार्म परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक बिबट्या अलगद अडकला. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर काल रविवारी या बिबट्याची रवानगी सुगाव येथील रोपवाटिकेत करण्यात आली. सुनील आभाळे यांच्या शेता जवळच्या परिसरात शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ हा पिंजरा लावला होता. सायंकाळी या पिंजर्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या रात्री या पिंजर्यात अलगद अडकला. नुकतेच या बिबट्याचे एक वर्ष वयाचे बच्चडे विहिरीत पडलेले होते. त्याला वनविभागाने पकडून नेल्यापासून हा बिबट्या चवताळला होता.
जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर
शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536
Website Title: Latest News Akole Plenty of hungry Bibatya