Home अकोले संकष्टी निमित्त वरदविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

संकष्टी निमित्त वरदविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

कोतूळ:  संकष्टी चतुर्थी निमित्त कोतूळ ता.अकोले येथील प्राचीन व जागृत श्री वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी  रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
      धार्मिकतेच्या बाबीने महिला वर्गात मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्व असून दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होती.पहाटेच्या थंड वातावरणात हि दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.पहाटे भूपाळी वादना नंतर शेखर शेटे यांच्या हस्ते महापूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. 
     दुपारनंतर रवींद्र पाठक पुणे यांच्या वतीने भाविकांना शाबूदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले.अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला. भाविकांसाठी मंदिरात पिण्याचे पाणी खिचडी वाटप,अभिषेक व्यवस्था,देणगी कक्ष आदी सुविधा देवस्थानच्या वतीने करण्यात आल्या होत्या.संध्याकाळी सामुदाईक अथर्वशीर्ष पठणाचा आयोजन करण्यात आले होते. अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व वेदिका  परशुरामी, सविता घाटकर, मनीषा वरसाळे,मीना आरोटे,प्रज्ञा भाटे,द्वारका पोखरकर,स्नेहल राउत,मिना देशमुख, यांनी केले या  वेळी मोठ्या संखेने भाविक उपस्थित.सौ.मनीषा व संजय वरसाळे यांच्या हस्ते  संध्याकाळी आरती करण्यात आली. देवस्थानच्या च्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला.या वेळी उपसरपंच राजेंद्र देशमुख,कैलास देशमुख,संभाजी पोखरकर,वासुदेव साळुंके,गणेश गिरे,उत्तम देशमुख,तुकाराम आरोटे,विशाल बोऱ्हाडे,निवृत्ती पोखरकर,रावसाहेब देशमुख,माणिक देशमुख,मुकुंद खाडे,अनिल खरात,दीपक राउत,दत्तात्रय फुलसुंदर,विनय समुद्र,चंद्रकांत वाकचौरे, यांच्या सह भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
Website Title: Latest news Vardavinayak Temple to celebrate the occasion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here