Home Sangamner News आईला जीपच्या टायरखालून बाहेर काढत लेकीने दिले जीवदान

आईला जीपच्या टायरखालून बाहेर काढत लेकीने दिले जीवदान

Leki gave her life by pulling her mother out from under jeep Accident

Sangamner Accident | संगमनेर : आपली स्वतःची आई आपल्या डोळ्या देखत जीप गाडीच्या टायरच्या खाली गेली होती मात्र त्या आईच्या बारा वर्षीय लेकीने प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत सर्वशक्ती निशी जीपच्या चाकाखाली पडलेल्या आपल्या आईला मृत्यूच्या दाढेतून मागे ओढले अन त्या जीवघेण्या अपघातातून (Accident) आईला वाचविले .

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,  संगमनेर येथील पत्रकार आणि प्राथमिक शिक्षक सुनील नवले यांची बारा वर्षांची कन्या आर्या सुनील नवले ही मुलगी रात्र भर तापाने फणफणलेली होती. त्यामुळे  प्रथमिक शिक्षिका असणाऱ्या आर्याच्या आई मनिषाताई या तिला एका खाजगी दवाखान्यात चाललेल्या होत्या .त्यांची दुचाकी अकोले नाक्याकडे येत असताना समोरून अचानक चुकीच्या दिशेने एक महिला दुचाकीवर आली. त्याच वेळी मागून आलेल्या जीप चालकाने जीप रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. दोन वाहनांच्यामध्ये सापडलेली स्कुटी थांबविण्याच्या प्रयत्न करत असणाऱ्या मनिषा नवले व आर्या दोघीही जिपचा धक्का लागून खाली पडल्या होत्या मनीषा या जिपच्या मागील चाकाच्याका ही फूट पुढे पडलेल्या होत्या. काही सेकंदामध्ये त्यांच्या अंगावरुन जीपचे मागील चाक जाण्याची वेळ आली होती. बाजूलाच पडलेल्या आर्याने समोरील दृश्य पाहिले आणि ती गर्भगळीत झाली. स्वतःच्या जखमा आणि तापाने फणफणलेले शरीर विसरून मोठ्या धाडसाने तिने आईच्या एका हाताला धरून मागे खेचले अन प्रसंगावधान राखत आर्याने आपल्या आईचे धाडसाने प्राण वाचविले परंतु आईचा उजवा हात मात्र चाकाखाली सापडला असल्यामुळे हाताच्या पंजाचा पूर्णपणेचेंदा मेंदा झाला होता. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ‘

आर्याने जीपगाडी खाली गेलेल्या आपल्या जमदात्या स्वतःच्या आईला मोठ्या धाडसानेबाहेर ओढले म्हणून तिचे प्राण वाचले. या दाखवलेल्या आर्यांच्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ती शिक्षण घेत असलेल्या स्ट्रॉबेरी शाळेच्या संस्थापिका संज्योत वैद्य आणि प्राचार्य रमेश दिघे यांनी तिला या वर्षीचा विरश्री पुरस्कार जाहीर करत तिचा सत्कार केला आहे.

Web Title: Leki gave her life by pulling her mother out from under jeep Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here