Home क्राईम धक्कादायक: टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली

धक्कादायक: टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली

Shocking Taylor stabbed the customer in the stomach

पुणे: टेलर आणि त्याच्या ग्राहकात झालेल्या घटनेनं पुणे हादरलं आहे. संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच शिवण कामासाठी वापरली जाणारा कात्री खुपसल्याने ग्राहक जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील चंदननगर परिसरातून धककादायक घटना समोर आली आहे. कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसली. या घटनेत ग्राहक जखमी झाला आहे. अजय प्रभाकर पायाळ (24 वडगाव शेरी ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील आनंद पार्क येथील मुज्जमील टेलर शॉप मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो. पीडित तरुण व त्याचा मित्र त्यांच्याकडे पँट अल्टर करण्यासाठी दुकानात गेले . तिथे त्यांनी पॅन्ट अल्टर करून घेतली. त्यानंतर पीडित ग्राहक व आरोपी यांच्यात पैसे देण्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. यातूनच दोघांमध्ये भांडण झाली. यामध्ये संतापलेल्या आरोपीने पीडित तरुणाला स्टूल फेकून मारला व रागाने कात्री त्याच्या पोटात खुपसली अशी तक्रार पीडित तरुणाने दिली आहे. प्रकरणी पुढील  तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking Taylor stabbed the customer in the stomach

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here