Home अकोले अकोले: दारूचे दुकान फोडले; मालकाने चोरट्यांना कोंडले, धक्कादायक खुलासा आला समोर

अकोले: दारूचे दुकान फोडले; मालकाने चोरट्यांना कोंडले, धक्कादायक खुलासा आला समोर

Akole News: परवानाधारक देशी दारूचे दुकान फोडताना (Busted) दोन चोरट्यांना दुकान मालकाने कोंडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Liquor shop busted The owner caught the thieves

कोतूळ: येथील गावाबाहेर असलेल्या परवानाधारक देशी दारूचे दुकान फोडताना दोन चोरट्यांना दुकान मालकाने कोंडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांनी दिलेल्या जबाबामुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे तालुक्यातील परवानाधारक दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्राथमिक चौकशीत चोरट्यांनी सावरचोळ फाटा येथील एक अवैध दारूविक्रेता आमच्याकडून हजार रुपये बॉक्सप्रमाणे या चोऱ्या करून घेतो असे सांगितले. त्यामुळे अकोले तालुक्यात आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दारू चोरी हा नवा प्रकार पुढे आला आहे. मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकोले तालुक्यातील देशी-विदेशी अवैध दारू गेल्या काही दिवसांपासून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे जवळपास बंद झाली. मात्र गेल्या दोन तीन वर्षांत अकोले संगमनेर तालुक्यातील अनेक देशी-विदेशी परवानाधारक दुकाने चोरट्यांनी फोडली. त्याचा तपासही लागला नाही. लाखो रुपयांची चोरीच्या दारूची चोरी कोण करवते? याचा खुलासा थेट चोरट्यांनी केल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कोतूळ येथील शिवाजी तुकाराम देशमुख यांच्या देशी दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही आहेत. त्यांच्या कुटुंबातील सर्व मोबाइलवर पहाटे दोन वाजता सायरन वाजू लागले. कुणीतरी दुकानात शिरले असल्याचे संकेत आल्याने त्यांनी पुतण्यांना संपर्क  केला. काही मिनिटांत दुकानाला गराडा घालून दरवाजे बंद केले. त्यामुळे चोरटे आतच कोंडले गेले. अर्धा तासात पोलिस घटनास्थळी आले. पोलीसांनी आरोपी ताब्यात घेतले. या दुकानातून गेल्या चार-पाच वर्षांत लाखो रुपयांचा माल चोरीला गेला.

Web Title: Liquor shop busted The owner caught the thieves

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here