Home अहमदनगर लोणी खुर्दमध्ये शरद पवार यांची पाठ फिरताच राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी सोडला पक्ष

लोणी खुर्दमध्ये शरद पवार यांची पाठ फिरताच राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी सोडला पक्ष

Loni Four NCP members left the party

लोणी: लोणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) चार सदस्यांनी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळात प्रवेश केला आहे. यामुळे सरपंच जनार्दन घोगरे यांनी सत्ता अडचणीत आली आहे. गुरुवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणी खुर्दमध्ये भेट दिली होती.  घोगरे यांना ‘कामाला लागा’ असा संदेशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांनी लोणी सोडताच चार सदस्यांनी घोगरे यांची साथ सोडल्याचे पहायला मिळाले.

शनिवारी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे सदस्य शरद आहेर, संगीता तुपे, प्रदीप ब्राह्मणे व मायकल ब्राह्मणे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनसेवा मंडळात प्रवेश केला.

सध्या सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे ६ सदस्य उरले आहेत. तर विरोधी सदस्यांची संख्या १० झाली आहे. एक जागा रिक्त आहे. आता पुढे काय घडामोडी होणार, सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया कशी असेल, याबाबत चर्चा चांगलीच रंगत आहे.

Web Title: Loni Four NCP members left the party

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here