Home क्राईम माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अखेर अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अखेर अटक

Former Home Minister Anil Deshmukh finally arrested by ED

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. याप्रकरणी देशमुख यांना तब्बल 13 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून अखेर अटक करण्यात आली आहे.

काल 1  नोव्हेंबरला सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर जी त्यांची चौकशी सुरू झाली, ती आतापर्यंत सुरू होती. त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीय. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला गैरहजर राहिले होते. काल झालेल्या 13 तासांच्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख चौकशीला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते, अशी माहिती देखील समोर येत आहे.

आज सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. याअगोदर अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Former Home Minister Anil Deshmukh finally arrested by ED

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here